Monetize your website traffic with yX Media
Manoranjan

‘दंगल गर्ल’ जायरा वसीमने केले बॉलीवूडला तोबा तोबा !!

Monetize your website traffic with yX Media

दंगल मध्ये आपली छाप सोडणारी दंगल गर्ल जायरा वसीम सध्ये चर्चेमध्ये दंगल घालत आहे .जेव्हापासून तिने सांगितलं आहे कि ती अल्लाह साठी बॉलिवूड सोडत आहे तेंव्हापासून एकच चर्चा होत आहे .अखेर दंगल गर्लला एकदमच अल्लाहची आठवण कशी झाली .कि ती कोणाच्या दबावाखाली आहे ?

zaira wasim

zaira wasim

जायरा वसीमने आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये ही तोबा तोबा वाली कथा मांडली आहे .तिने सांगितलंय कि तिच्या धार्मिक मान्यतांना मानत तिने बॉलिवूड मधून सन्यास घेतला आहे .

फेसबुकवर पोस्ट शेयर करत जायरा सांगते कि मी पाच वर्षांपूर्वी जो निर्णय घेतला त्याने माझी ज़िन्दगी बदलली .जेंव्हा मी बॉलिवूड मध्ये आपलं पाऊल टाकलं .माझ्या या यात्रेंन मला खूपच थकवा जाणून आला .आता पुन्हा एकदा नवीन निर्णय घेत आहे ज्यामुळे इंशाह अल्लाह पुढे चांगलं होईल

  • हिला थकवा जाणून आला कि आणण्यात आला हे आता या दंगल गर्ललाच माहित .याच कारण हिच्यावर दंगल आणि सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटांमुळे हिच्यावर फतव्यांचा पूर आला होता .आणि अशा पुरांमुळे थकवा जाणवतो !!

पुढे ती म्हणते मी आतापर्यंत माझ्या अंतरात्मासाठी खूप लढत होते .आपल्या या छोट्याश्या कमी वयात मी एव्हडी मोट्ठी लढाई लढू शकत नाही.म्हणून मी या फिल्ड मधून सन्यास घेत आहे . मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे .

  • कोणत्या मोठ्या लढाईबद्दल जायरा बोलत आहे ? जायरा हि काश्मीरची आहे .आणि काश्मीरमध्ये अलगावाद्यांचा दबदबा खूप आहे.कट्टरता तर आहेच .या कट्टर लोकांबद्दलच जायरा बोलत आहे का ? या कट्टर जिहाद्यांनी जायराला धमक्या याआधी सुद्धा दिल्या आहेत .तिला तिच्या घरच्यांना मारण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या होत्या .याच मोठ्या लढाईबद्दल जायरा बोलत आहे ?
  • जर हिचा निर्णय खरोखरच धार्मिक मान्यतांना घेऊन असेल तर बॉलिवूड मध्ये अनेक असे मुस्लिम कलाकार आहेत .आहेत काय तर खूपच मोट्ठे आहेत .सलमान,शाहरुख आणि जिच्याबरोबर हिने काम केलं तो आमिर खान .मग यांचं काय होणार ? हे आपल्या धर्मप्रमाणे चालत नाहीत म्हणून ते आता जहन्नुम मध्ये जाणार असा अर्थ घ्यायचा का ?
  • आणि जर धर्माप्रमाने चालायचंच असेल तर मनोरंजन , टेक्नोलोंजि ,विज्ञान ,अशा तमाम गोष्टी सोडाव्याच लागतात का ? तर मग या सर्व गोष्टींपासून वंचित राहायचं असेल तर काय पर्याय आहे ?. आणि असं खरोखरच शक्य आहे का ?
  • कि जहन्नुम सर्वांसाठी अटळ आहे कारण नेमक्या ईदच्या दिवशीच सलमान खान आपली फिल्म रिलीज करतो .तेंव्हा सारे ईदच्याच दिवशी स्लो मोशन सारखी गाणी असलेली गाणी बघून रोमान्स बघून टाळ्या शिट्टया मारून येतात तेंव्हा आलाहचा कोप यांच्यावर होत नसतो का ?आणि जर अशा सर्वांवर कोप होत असेल तर मग फक्त कल्पना केलेलीच बरी कि किती लोक जहन्नुम मध्ये जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा – ‘वंदे मातरम्’ हे इस्लाम विरोधी

विचित्र योगाचा व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल, ‘हे काय होत आहे भाऊ ‘

आपल्याला काय वाटत जायराने हे योग्य केलंय का कमेंट करून सांगा 

 

आमचे लेख वाचण्यासाठी आम्हाला फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |

 

 

Loading...

Leave a Comment