Banava Banavi Marathi news

तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटलं : जलसंधारण मंत्री

जलसंधारण मंत्र्यांचा अजब गजब दावा म्हणे तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटलं !!

चिपळूणमधील तिवरे धरण  निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे नाही तर म्हणे खेकड्यांमुळे फुटला ..होय असा गजब दावा आपले मंत्री साहेब अर्थात श्री… श्री.. श्री.!!.तानाजी सावंत करत आहेत .

Tiware dharan khekade tanaji sawant

Tiware dharan khekade tanaji sawant

ते असे म्हणाले की, जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना  गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे धरणाची दुरुस्ती केली होती . पण खेकड्यांच्या  प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने धरण फुटले .

यावर तानाजी सावंत पुढे म्हणतात तिवरे धरण हे २००४ साली चालू झाले.यानंतर सातत्याने धरणात १५ वर्षे  पाणी साठत होते .पण आता ते कोरडे पडले आणि त्याला तडे गेले . अशाप्रकारचा प्रकार कधी घडला नव्हता. गावकऱ्यांनी ज्या प्रमाणे गळती दाखवली होती त्या सर्वांची डागडुजी झाली होती .पण या खेकड्यानी सगळा राडा केला आणि आपली आई घातली .त्यांचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण !!

या खेकड्यांच्या विचार करून मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे या खेकड्यांची व दुर्घटनेची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी होईल.आठ तासांमध्ये १९२ मिलिमिटर धरणाच्या जवळ पाऊस झाला होता. यावर गावकर्यांनी ढगफुटीचा अंदाज लावला होता . आपले लाडके मंत्री सावंत पुढे म्हणाले काही गोष्टी विधिलेकीत असतात त्या कसे बदलू शकतो .ते कुणाच्या हातात सुद्धा नसत .

तिकडे बाकीचे खेकडे कोम्यात गेले आहेत .तर त्या धरणांमधील खेकड्यानी आंदोलनाची धमकी दिली आहे .त्यांचा आरोप आहे कि एव्हडा मोठ्ठा आरोप आमच्यावर लावला कसा .लोकांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे  कि या धरणातील खेकडे ताकतवर आणि भरगच मास असलेले आहेत .लोक आम्हाला भाजून तळून आणि आमचा रस्सा करण्यासाठी तुटून पडतील .

 

 

 

Leave a Reply