Marathi news

मराठा आरक्षण : निकालाविरुद्ध सदावर्ते सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजा ठोठावणार

मराठा आरक्षणाच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी आपण सहमत नाही !!

sadavarte – मराठा आरक्षणाच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी आपण सहमत नाही. तसेच आम्ही उच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहोत, असे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले , सदावर्ते यांनीच मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा या निर्णयामध्ये  प्रभाव असल्याचे धक्कादायक आरोप सुद्धा त्यांनी लावले .

sadavarte

sadavarte

कोर्टाने दिलेला निर्णय न्यायिक शासनाच्या विरोधात आहे. न्यायमूर्ती रणजीत मोरे यांनी आधीच सांगितले होते की ते या प्रकरणात भाग घेणार नाहीत असे त्यांनी आधीच सांगितले होते , ‘त्यांनी ‘नॉट बिफोर मी’ केलेले असताना सुद्धा हे प्रकरण चालवायला घेतले .

यापूर्वी, जयश्री पाटील यांच्या यांच्या खटल्यादरम्यान सदावर्ते याचिकेवर सुनावणी ऐकली जाणार नाही अशी आदेशीतही केली होती. जेव्हा आम्ही याबद्दल मुख्य न्यायाधीशांना माहिती दिली तेव्हा न्यायाधीश मोरे यांनी न्यायिक शिस्तपालनानंतर केस ऐकायला नको होते. न्याय रंजीत मोरे यांच्या खंडपीठाने दिलेला निर्णय असंवैधानिक आहे.

या निर्णयामुळे लोकांना मुक्त कक्षांमध्ये कमी जागा मिळेल. हा निकाल म्हणजे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या सिद्धांतांची गळचेपी करणारा आहे असे सुद्धा त्यांनी सांगितले . तसेच न्यायालयाने हा निर्णय स्थगित करण्यासही नकार दिला. सदावर्ते म्हणाले की याबद्दल अधिक अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयात याविरोधात दाद मागणार आहोत .

सदावर्ते पुढे म्हणाले कि देवेंद्र फडणवीस सरकारचा या केस मध्ये प्रभाव आहे .तसेच त्यांच्या एका नेत्याला आधीच कसे कळाले कि निकाल आपल्याच बाजूने लागणार आहे .याबाबत चौकशी झाली पाहिजे,अशी मागणी सुद्धा सदावर्ते हे करणार आहेत असे त्यांनी नमूद केले.

मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देता येणार नाही !!

 

मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देता येणार नाही .१२ ते १३ टक्के मर्यादा नोकरी आणि शिक्षण यामध्ये आणली पाहिजे असे न्यायालयाचे  म्हणणे आहे. पण  निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला गेला आहे.

 

 

Leave a Reply