Marathi news

संसदेत जय श्रीरामचे नारे नकोत !!

महाराष्ट्रातील अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांची मागणी !

जेव्हा आम्ही संसदेत सदस्यता घेण्याचे शपथ घेत होते तेव्हा काही खासदार जय श्री राम नारेबाजी करत होते. जय श्रीरामांच्या नाऱ्यासाठी संसद हे योग्य ठिकाण नाही. त्यासाठी मंदिरे आहेत. माझा विश्वास आहे की सर्व देव एकच आहेत . तथापि, नवनीत राणा कौर यांनी संसदेत जय श्रीराम हे नारे योग्य नाहीत अशी भूमिका बजावली आहे. नवनीत राणा कौर या आमदार आहेत. ते अमरावतीमधून निवडून आल्या आहेत.

navneet kaur

navneet kaur

कालपासून संसदेचे बजेट सत्र सुरू झाले होते . मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर हा पहिला सत्र आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला 303 जागा मिळाल्या. एनडीएच्या मदतीने भाजपला 350 जागा मिळाल्या आहेत. कालच्या अर्थसंकल्पात सर्व सदस्यांनी शपथ घेतली होती .

जय श्रीरामचे नारे शपथ घेताना दिले गेले होते . यावरच ननवनीत राणा कौर यांनी आपत्ती व्यक्त केली होती. मी सर्व देवांवर विश्वास ठेवते . मला वाटत की सर्व देव एकच आहेत. नवनीत कौर असे म्हणाल्या की कुणा एकावर लक्ष्य साधण्यासाठी जय श्री रामच्या घोषणा ‘योग्य नाही,आता नवनीत राणा कौर यांच्या या मागणीची उत्तरे कसे येतील ? यांची ही अशी मागणी सरकार कसे घेणार आहे ? हे पहाणे महत्वाचे आहे.

याआधी सुद्धा ममता बेनर्जी पण जय श्रीराम या नाऱ्यावर वर भडकल्या होत्या .जेंव्हा त्यांचा गाडीच्या काफिल्याच्या जवळ लोकांनी जय श्रीरामचे नारे लावले होते . त्या चक्क गाडीतून उतरून लोकांवर भडकल्या होत्या . त्यांनतर ममतांवर सोशल मीडियावरून भरपूर प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यांच्या प्रत्येक फेसबुक पोस्ट वर जय श्रीरामचे नारे भरभरून गेले होते आणि अजूनही जाताहेत .

आता पुन्हा एकदा नवनीत राणा कौर यांनी जय श्रीराम नाऱ्यावर आक्षेप घेतलाय .आता सोशल मीडियावरून याची काय प्रतिक्रिया येईल .हे पहावं लागणार आहे .

तसे पाहता नवनीत राणा कौर आणि ममता दीदी अशा लोकांना या नाऱ्याने काय त्रास होतो ते रामच जाणे !!

Leave a Reply