Ajab Gajab

ट्विटरचे CEO! इतके घेतात कमी पगार !

ट्विटरचे CEO चे पगार !

ट्विटरचे सीईओ इतके घेतात कमी पगार ! तुम्हाला माहित आहे का ? तुम्ही चकित व्हाल !

jack dorsey salary in marathi

jack dorsey salary

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी 2018 मध्ये इतका कमी पगार घेतला आहे की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल . एवढेच नव्हे तर, 2015 मध्ये पुन्हा सीईओ बनल्यापासून ते कोणताही पगार किंवा सुविधा त्यांनी घेतल्या नव्हत्या.

ट्विटरचे साइटचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी2018 मध्ये किती कमी पगार घेतले , हे जाणून घेण्यास तुम्हाला उत्सुकता वाटेल.खरं तर, त्यांनी या संपूर्ण वर्षात फक्त $ 1.40 (सुमारे 97 रुपये) इतके पगार घेतले आहे. एवढेच नव्हे तर, सन 2015 मध्ये सीईओ बनल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी इतका पगार घेतला आहे, म्हणजे यापूर्वी त्यांनी कोणतेही वेतन घेतले नाही. (बसला ना धक्का !!) 

कंपनीने यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (एसईसी) यांना सांगितले की 2018 मध्ये ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांना 1.40 डॉलर अर्थात (97 रुपये) प्राप्त झाले. डोर्सी  ट्विटरचे को-फाउंडर सुद्धा आहेत.

कंपनीच्या सुरूवातीला दोन वर्षांसाठी ते CEO होते, परंतु 2008 मध्ये त्यांनी पद सोडले होते. वर्ष 2015 मध्ये ते पुन्हा ट्विटरचे प्रमुख झाले. यानंतर 2015, 2016 आणि 2017 मध्ये कंपनीचे कोणतेही वेतन किंवा फायदे ते घेतले नाहीत.

याशिवाय , मोबाइल पेमेंट कंपनी  ‘स्क्वायर’ वरून त्यांना प्रति वर्ष 2.75 डॉलरचा पगार मिळतो.डिसेंबर 2018 मध्ये, डोर्सीने स्क्वायरचे 17 लाख शेअर्स विकले होते . फोर्ब्सच्या मते, त्यांनी सुमारे 8 करोड़ डॉलर कमावले होते.

डोर्सी एकमात्र व्यक्ती नाहीयेत जे कमी वेतन घेतात

डोर्सी एकमात्र व्यक्ती नाहीत  जे  $ 1 च्या आसपास वेतन घेतात .फेसबुकचे सीईओ मार्क जुकरबर्ग, ओरॅकलचे लॅरी एलिसन आणि गुगलचे लॅरी पेज आणि सेर्गेई ब्रिन देखील दर वर्षी एक डॉलरचे वेतन घेतात. 2012 मध्ये मार्क जुकरबर्ग यांनी वेतन व बोनस म्हणून वार्षिक 7.70 लाख डॉलर घेतले होते, आता ते सर्वात कमी पैसे घेतले गेलेले फेसबुक कर्मचारी आहेत.

Leave a Reply