Teck Marathi

हे आहेत जगातील सर्वात हॅक केले जाणारे पासवर्ड

आपले खाते हॅक होण्यामध्ये अनेकदा आपल्या स्वत: च्या चुका सुद्धा असतात . पासवर्ड सोपे ठेवणे ही सर्वात मोठी चूक आहे. आम्ही तुम्हाला अशा काही यादी देत आहोत कि जे काही पासवर्ड आहेत जे सर्वात सोपे आहेत आणि अशा प्रकारचे पासवर्ड सहजरित्या हॅक केला जातो .तर मग चला बघुयात कोणते आहेत ते पासवर्ड.

hacked password list in Marathi

hacked password list in Marathi

 

डिजिटल जीवनातील सर्वात मोठी समस्या म्हणजे पासवर्ड मॅनेज करण्याची व सुरक्षित कसे राहील याची  .बऱ्याच प्रकारची खाती असतात आणि बहुतेक लोक सोप्या पासवर्डचा मार्ग निवडतात. पासवर्ड कदाचित चुकून विसरू नये म्हणून , पण असे पासवर्ड कुणालाही गसवू शकतात . जगातील सर्वात सोपे आणि कमकुवत पासवर्ड म्हणजे 123456 हे आहे.

ब्रिटनच्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा केंद्राने सर्वेक्षण केले आहे. या नवीनतम सर्वेक्षणानुसार, लाखो वापरकर्ते अद्याप 123456 त्यांच्या खात्यावर पासवर्ड म्हणून वापरतात.

सुमारे 23.2 दशलक्ष वापरकर्ते पासवर्ड म्हणून 123456 चा वापर करत आहेत , तर 7.7 दशलक्ष वापरकर्ते 123456789 चा वापर करत आहेत .हे आकडे या एजन्सीद्वारे जारी केले जातात. याव्यतिरिक्त, अशा इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या कमी नाही, जे qwerty, password आणि 11111 पासवर्ड ठेवतात.

हे सुद्धा वाचा – नासाची चेतावणी

याशिवाय, असे वापरकर्ते देखील आहेत ज्यांच्याकडे त्यांच्या आवडत्या सुपरस्टारचे नाव पासवर्ड म्हणून ठेवतात . त्यापैकी सुपरमॅन क्रमांक 1 वर आहे, त्यानंतर naruto, trigger, pokemon आणि बॅटमॅन समाविष्ट आहेत. काही लोक त्यांच्या आवडत्या संघाचे नाव पासवर्ड म्हणून ठेवतात , त्यात लीवरपूल, चेलसी, आर्सेनल सारख्या संघाचा समावेश असतो.

NCSC चे टेक्निकल डायरेक्टर डॉ. इयान लेवी यांनी सांगितले आहे की पासवर्ड अशा प्रकारे ठेवला पाहिजे, कुणीही गेस करू शकत नाही. तीन रैंडम पासवर्ड ठेवा जे आपण सहज लक्षात ठेवू शकता आणि कुणीही गेस करू शकत नाही.

या रिपोर्टमध्ये ,  ब्रिटेनच्या राष्ट्रीय सायबर सिक्युरिटी एजन्सीने असेही म्हटले आहे की 23 दशलक्ष वेळा वेगवेगळ्या डेटा ब्रीच मध्ये असे अकौंट लीक झाल्या आहेत .ज्यांच्या खात्यांमध्ये 123456 असे पासवर्ड आहेत.

हे सुद्धा वाचा – ट्विटरचे CEO! इतके कमी घेतात पगार !

ट्रॉय हंटने बनविलेल्या “Have I Been Pwned” कडून घेतलेल्या शीर्ष 100,000 पासवर्डची यादी जाहीर केली आहे. जर आपल्याला ट्रॉय हंटबद्दल माहित नसेल तर त्याने अलीकडेच जगातील सर्वात मोठ्या ईमेल आयडी ब्रीचचा उलघडगा केला होता .

खाली दिलेल्या लिस्ट मध्ये सर्वात कमकुवत पासवर्डची सूची दिल्या आहेत. आपण यापैकी कोणत्याही पासवर्डचा वापर करत असल्यास तो ताबडतोब बदला.

 

– 123456

– 123456789

– Qwerty

– Password

– 111111

– 12345678

– abc123

– 1234567

– password1

– 12345

– 1234567890

– 123123

– 000000

– Iloveyou

– 1234

– 1q2w3e4r5t

– Qwertyuiop

– 123

– Monkey

– Dragon

Leave a Reply