Science in Marathi

नासाची चेतावणी ,एस्टेरॉयड  मारू शकतो पृथ्वीला टक्कर !!

नासाची चेतावणी ,एस्टेरॉयड  मारू शकतो पृथ्वीला टक्कर , विस्कळीत होऊ शकते जनजीवन

asteroid on earth in marathi

asteroid on earth in marathi

नासाचे प्रमुख जिम ब्रेन्डस्टीन यांनी चेतावणी दिली आहे की किलर एस्टेरॉयडची कल्पना यापुढे कोणत्याही सायन्सफिक्शन चित्रपटापर्यंतच  मर्यादित न राहता . आता हे वास्तविक जीवनात सुद्धा घडू शकते. अशा एस्टरॉइडमुळे पृथ्वीचा नाश होऊ शकतो.

वॉशिंग्टनमधील प्लॅनेटरी डिफेन्स कॉन्फरन्समध्ये जिम ब्रॅडस्टीन यांनी सांगितले की एस्टेरॉइडचा टक्कर केवळ चित्रपटांपर्यंतच मर्यादित नाही. हे आता आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये सुद्धा सत्यात घडू शकत, म्हणूनच आपली पृथ्वी वाचविणे हे आपले कर्तव्य आहे.

त्यांच्या या दाव्यावर जिम ब्रॅडस्टीनने म्हटले आहे की 2013 मध्ये एक एस्टेरॉईड चेलियाबिंस्क मध्ये एकदा टक्कर दिली होती , ज्यामुळे तिथे  66 फूट असा खड्डा पडला होता!!

marathi tashan

(Photo courtesy: Twitter)

दक्षिणी यूराल प्रदेशात अशाच एका टकरीमुळे तिथे सुद्धा भरपूर प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले होते तसेच तिथे सुमारे 1500 लोक जखमी  झाले होते.

नासाने बनवले एस्टेरॉयड ट्रैक करण्याचा फॉर्मुला

नासाच्या जवळ सुमारे 140 मीटर किंवा त्याहून अधिक पृथ्वीच्या आसपास असलेले 9 0 टक्के एस्टेरॉयड ट्रैक करण्याची योजना आहे. सामान्यत एस्टेरॉईड पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत असताना त्याचा द्रव्यमान कमी होत असतो.

खास गोष्ट अशी आहे की नासा ज्या एस्टरॉइडचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहे, हे चेलियाबिंस्क मध्ये टक्कर दिलेल्या एस्टरॉइड पेक्षाही सातपट मोठ्ठा आहे !!

कशी वाटली ही बातमी ? शेयर करायला विसरू नका तसेच आमच्या फेसबुक पेजला सुद्दा like करा आणि खाली कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटत खरोखरच एस्टरॉइड भविष्यात पृथ्वीला येऊन टक्कर मारेल का ? अशावेळेस आपण काय कराल ?

 

 

 

Leave a Reply